Ad will apear here
Next
भोली सूरत...!
‘शोला जो भडके दिल मेरा धडके...’ या गाण्यावरील आपल्या अफलातून पदन्यासाबरोबर साऱ्या थिएटरला नाचवणारे तितकेच अफलातून अभिनेता मास्टर भगवान ऊर्फ भगवानदादा यांचा आज (चार फेब्रुवारी) स्मृतिदिन.

रंकाचा राव व पुन्हा रावाचा रंक अशी भगवानदादांची चित्तवेधक जीवन कहाणी. मुंबईच्या गिरणगावात लहानाचे मोठे झालेले भगवान पालव सिनेमाचे वेड व त्यातील यश यामुळे मास्टर भगवान बनले. ते इतके मोठे झाले, की त्यांनी चेंबूरला आरके स्टुडिओच्या शेजारीच स्वत:चा सिनेस्टुडिओ उभारला. जुहूला समुद्रासमोर बंगला बांधला व सात दिवसांसाठी सात ऐषारामी गाड्या घेतल्या; पण पुढे हे सर्व वैभव जात जात दादा पुन्हा गिरणगावातील त्याच चाळीत आले व तिथेच वयाच्या ८९व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

... मात्र उमेदीच्या काळात दादांनी केवळ सिनेसृष्टीला नव्हे, तर सर्व चित्रपट शौकिनांना आपल्या तालावर अक्षरश: नाचवले. त्यांचा पदन्यास अमिताभ बच्चन यांनीही अंगीकारला.



बराच काळ ‘लो बजेट’ सिनेमांची निर्मिती करणाऱ्या भगवानदादांनी १९५१मध्ये ‘अलबेला’ आणला आणि जणू क्रांती झाली. गीता बालीची साथ व सी. रामचंद्र यांची थिरकती चाल यामुळे ‘अलबेला’ कमालीचा हिट झाला. त्यातले प्रत्येक गाणे आज ७० वर्षांनंतरही तितकेच लोकप्रिय आहे.

बेढब, स्थूल शरीरयष्टी, मोठाले डोळे असूनही दादा लोकप्रयतेच्या शिखरावर पोहोचले, याचे कारण त्यांचा पदन्यास.

पुढे दिवस फिरले, दादांचे सिनेमे आपटले. त्यांना भूमिका मिळेनात, तेव्हा दादा मिळतील ती कामे करू लागले. सुषमा शिरोमणींच्या मराठी सिनेमांतही ते नाचताना दिसले.

एके काळी चाहत्यांच्या गराड्यातच राहणारे दादा लालबागला एकाकी जगू लागले. गीतकार राजेंद्रकृष्ण, सी. रामचंद्र व ओम प्रकाश हेच काय ते त्यांच्याकडे येत राहिले; पण तेही दादांच्या आधीच गेले.

भगवानदादा शरीराने गेले; पण त्यांचे नृत्य मात्र आजही पंचतारांकित हॉटेलांपासून गणपतीच्या मिरवणुका वा लग्नाच्या वरातींत दिसत राहते.

- भारतकुमार राऊत
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KUTNCV
Similar Posts
साम्यवादाचा जनक १९व्या व २०व्या शतकात ज्याच्या क्रांतिकारी विचारांनी अवघ्या जगाला भुरळ घातली व निम्म्या जगातील राज्यव्यवस्था पार बदलून गेली, असा साम्यवादी विचारसरणीचा उद्गाता कार्ल मार्क्स याचा आज (१३ मार्च) स्मृतिदिन!
सुंदर व सत्शील दुर्गाबाई! मराठी बोलपटाचा पहिला स्त्री चेहरा दुर्गा खोटे यांचा आज (१४ जानेवारी) जन्मदिन. त्यांच्या रूपेरी स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! ‘अयोध्येचा राजा’ या मराठी चित्रपटाबरोबर चित्रपट ‘बोलू’ लागला. या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केली होती. १९०५ साली जन्मलेल्या दुर्गाबाईंनी
निळा म्हणे...! महाराष्ट्राच्या संतपरंपरेने श्री ज्ञानेश्वरांपासून तुकडोजी व गाडगेबाबांपर्यंत अनेक अनमोल मणी जोडले; पण त्यातले काही विस्मृतीत गेले. संत निळोबाराय त्यापैकीच एक. त्यांची आज (चार मार्च) पुण्यतिथी.
‘ल्युटिन्स’चा कर्ता ज्याला नवी दिल्ली शहराची थोडी फार माहिती व शहराच्या इतिहासाची जाण आहे, त्यांना ‘ल्युटिन्स’ परिसराची माहिती असतेच. प्रशस्त रस्ते, दुतर्फा शोभिवंत फुलझाडे, शोभिवंत चौक आणि परिसरात सुंदर टुमदार बंगले व प्रशस्त प्रशासकीय इमारती हे सारे वैभव ही भारताच्या राजधानीची शान आहे. हा भाग ज्यांनी वसवला ते कल्पक वास्तुकार एडविन ल्युटिन्स

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language